शाहरूख करणार जुलैमध्ये सर्जरी

बॉलीवुडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खान त्याच्या खांद्याच्या दुखण्यामुळे गेल्या काही दिवसापासून बैचेन आहे. त्याने याबाबत डॉक्टरशी चर्चा केली असून त्यांनी खांद्याच्या दुखण्यासाठी सर्जरी करून घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे जुलै महिन्यात तो लंडनमध्ये जाऊन सर्जरी करणार आहे.

शाहरूख खान आयपीएल सामन्यामुळे तसेच चेन्नई एक्सप्रेसच्या शूटमुळे लंडनमध्ये गेला नाही. या सर्जरीनंतर त्याला किमान एक महीना बेडरेस्ट करावे लागणार आहे. त्यामुळे शाहरूखने सध्यस्थितीत सर्जरी करणे टाळले आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून या दुखण्यात वाढ झाल्याने त्याला लंडनला जावे लागणार आहे.

सध्या शाहरूखच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ या सिनेमाचे प्रमोशनचे काम सुरु आहे. तर दुसरीकडे आईपीएल सामन्यात त्याची कोलकाता नाईट राईडर्स ही टीम गेल्यावर्षी चैंपियन होती. त्यामुळे त्याचे सगळे लक्ष सध्या त्याच्या टीमच्या कामगिरीकडे लागले आहे. त्याचे हे दुखणे ‘रॉवन’ सिनेमाच्या शूटिंगपासून सुरु आहे. त्यावेळी एकदा त्याने सर्जरी केली होती. त्यानंतर पुन्हा आता त्याला त्रास होत आहे.

Leave a Comment