नवी दिल्ली दि.२७ – भारती सॉफ्ट बँकेने त्यांच्या नव्यानेच आलेल्या मेसेजिग अॅप’ हाईट ’ साठी आणखी ३७ कोटी म्हणजे ७० लाख डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येत असल्याचे घोषित केले आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी आलेल्या या अॅपने आत्ताच ५० लाख युजरचा आकडा पार केला आहे.
भारती एंटरप्रायजेस आणि सॉफट बँक कार्पोरेशनचा हा संयुक्त प्रकल्प असून मोबाईल इंटरनेट क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे. हाइ्ट हे फ्री मेसेजिंग अॅप असून त्याला ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व असल्याचे कंपनीचे संचालक माईक कायमोरी यांनी संगितले. कंपनीने हाईक २.० ही नुकतेच बाजारात आणले आहे.
हाईकच्या माध्यमातून युजर हाईक वापरत नसलेल्या मोबाईल युजरनाही मोफत एसएमएस पाठवू शकतात हे याचे वैशिष्ट्य आहे. भारतासारख्या ९० कोटी मोबाईल धारकांपैकी ९० टक्के युजर फिचर फोन वापरणारे आहेत. याचा चांगला फायदा कंपनीला मिळत असून हाईकचा भारतातील युजरचा हिस्सा ६० टक्के इतका आहे तर उर्वरित वाटा मध्यपूर्व आणि युरोपातील युजरचा आहे.