वॉशिग्टन दि.२७- या वर्षअखेर म्हणजे नोव्हेंबरच्या महिन्यात आकाश उजळून टाकणार्या आणि आत्तापर्यंत पृथ्वीवरून दिसलेल्या धुमकेतूतील सर्वात तेजस्वी ठरणार्या आयसॉन ( ISON )धूमकेतूची स्पष्ट आणि सुंदर छबी नासाच्या हबल स्पेस टेलिस्कोपने टिपली आहे.

वास्तविक सप्टेंबर २०१२ मध्येच या धुमकेतूचा शोध दोन रशियन हौशी खगोलप्रेमींनी लावला होता. विताली नेवस्की आणि आईयॉन नोव्हिचनोक अशी त्यांची नांवे. नासाच्या दुर्बिणीने या धुमकेतूचे तो गुरू ग्रहाजवळ असताना सुंदर फोटो टिपले आहेत. सध्या हा धुमकेतू पृथ्वीपासून ३६४ दशलक्ष किलोमीटर अंतरावर असून हे फोटो १० एप्रिल रोजी घेण्यात आले आहेत.
हा धुमकेतू नोव्हेंबर महिन्यात सूर्याजवळ पोहोचत आहे. त्यावेळी तो आपल्याला रात्रीच्या आकाशात मनोहर दर्शन देणार आहे. तो पौर्णिमेच्या चंद्राइतका तेजस्वी दिसेल असा अंदाज आहे. त्याचे डोके पाच हजार किलोमीटर रूंदीचे असून शेपूट ९२ हजार किमी लांबीची असेल असे संशोधकांचे म्हणणे आहे. सूर्य मावळताच तो आकाशात दिसू लागेल असेही संशोधकांचे म्हणणे आहे.