मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा वाढदिवस पुणे शहरात सचिन तेंडूलकर फ़न्स क्लबच्या वतीने उत्साहात साज

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा वाढदिवस पुणे शहरात सचिन तेंडूलकर फ़न्स क्लबच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला पुणे लष्कर भागातील न्यू मोदीखाना भागात राहणारे सचिन तेंडूलकरचे मोठ्या संख्येने छायाचित्र आणि कात्रणाचा संग्रह करणारे राजू गायकवाड यांनी दरवर्षीप्रमाणे यदाच्या वर्षी सचिनचा वाढदिवस केक कापून बालचमुंच्या उपस्थित जलोशात साजरा केला . गेले अनेक वर्षापासून राजू गायकवाड यांनी सचिनची छायाचित्र आणि कात्रणाचा संग्रह केला आहे . खुद्द सचिनने हा संग्रह पहिला असता सचिन देखील भारावून गेला होत. सचिनने देखील राजूला या संग्रहांबद्दल शाबासकी दिली होती

यावेळी राजू गायकवाड यांनी सचिनच्या वाढदिवसाबद्दल सांगितले कि , सचिन चा वाढदिवस आम्हा चाहत्यांसाठी आनंदाचा दिवस असतो त्यामुळे आम्ही घरातील सर्वजण मिळून आनंदाने वाढदिवस साजरा करतो , हैप्पी बर्थडे टू यू सचिन हैप्पी बर्थडे टू यू …. चा गजर करून सचिनला केक भरवून वाढदिवस साजरा करण्यात आला
या वाढदिवस सोहळ्यामध्ये विकास भाबुरे , ऋषिकेश निखळ , नितेश गायकवाड , शिवानी गायकवाड , केदार गायकवाड , सुनिता गायकवाड , कैवल्य गायकवाड आणि सचिन चा चाहता वर्ग सहभागी झाला होता