अमृतसर दि.१६ – सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी अमृतसरजवळील खेमकरण भागात भारत पाकिस्तान सीमेवर सुमारे ९५ कोटी रूपयांचे हेरॉईन आणि १००० रू. मूल्याच्या सुमारे पाच लाख रूपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

सीमा सुरक्षा दलाचे डीआयजी जैसवाल या विषयी अधिक माहिती देताना म्हणाले की सीमा सुरक्षा दलाच्या गस्ती पथकाला वरील भागात फेन्सजवळ कांही संशयास्पद हालचाली जाणवल्या. त्यावेळी त्यांनी फेन्सजवळ आलेले कांही घुसखोर पुन्हा पाकिस्तान हद्दीत पळून जाताना पाहिले. जवळ जाऊन तपास केला असता १९ किलो हेरॉईन छोट्या पिशव्यातून बांधलेले त्यांना आढळले तर अन्य एका पिशवीत बनावट नोटा होत्या. हा सारा माल जप्त करण्यात आला असला तरी अद्यापी कोणालाही अटक झालेली नाही.
अमली पदार्थ भारताच्या हद्दीत पाठविण्यासाठी १० फूट लांबीचा प्लॅस्टीक पाईप वापरला जात होता असेही दिसून आले. हा पाईप भारताच्या सीमेजवळील कुंपणापाशी आणून त्यातून हे पदार्थ आपल्या हद्दीत टाकले जात होते. हा माल कुणी मागिवला होता त्याचा तपास सुरू असल्याचेही जैसवाल यांनी सांगितले.