मुंबई, दि.१६ – पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटाच्या तपासामुळे अनेक महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश पडला. विशेष म्हणजे, हा स्फोट घडवण्यासाठी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा आणि इंडियन मुजाहिदीन (आयएम) या दहशतवादी संघटना प्रथमच एकत्र आल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख राकेश मारिया यांनी याबाबतची माहिती दिली.
तोयबा आणि आयएम प्रथमच एकत्र – एटीएस
जर्मन बेकरी स्फोट प्रकरणाशी संबंधित खटल्याच्या निकालामुळे प्रथमच तोयबा आणि आयएम या दोन्ही संघटनांच्या भूमिका सिद्ध झाल्या, असेही त्यांनी नमूद केले. दोन्ही दहशतवादी संघटनांना एकत्र आणणार्या हिमायत बेगला दोषी ठरवण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
