गांधीनगर, दि.१६ – गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी नव्या कार्यालयातून कामकाज पाहण्यास सुरुवात केली. त्यांचे नवे कार्यालय असलेल्या स्वर्णिम संकुल या चार मजली इमारतीच्या बांधकामासाठी १५० कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
मोदींचे कार्यालय आता दीडशे कोटींच्या इमारतीत
सचिवालयाच्या आवारात असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या जुन्या कार्यालयासमोरच नवी इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे बांधकाम सुमारे वर्षभरात पूर्ण झाले. स्वर्णिम संकुलचे काल दुपारी उद्घाटन झाल्यानंतर मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्यां्नी तेथील कार्यालयांतून कामकाज सुरू केले.
या इमारतीमध्ये मंत्री, सचिव यांच्या कार्यालयांबरोबरच मंत्रिमंडळ बैठकीसाठी स्वतंत्र दालनाची व्यवस्था केली आहे. या इमारतीमध्ये सुमारे १ हजार कर्मचारी काम करू शकतात. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तिसर्याक तर इतर मंत्र्यांची कार्यालये दुसर्यार मजल्यावर आहेत. मोदींचे कार्यालय बुलेटप्रुफ असल्याची चर्चा होती. मात्र, ही बाब सूत्रांनी फेटाळली आहे.
