आमदारांशी चर्चा करून राजीनाम्याबाबत निर्णय

मुंबई, दि.11- दुष्काळग्रस्ताबाबत अश्लील व्यक्तव्य केल्यामुळे अडचणीत सापडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. राजीनाम्याबाबत विधीमंडळातील आपल्या सहकार्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री पवार यांनी फलटण येथे दिली.

अजित पवार यांनी दुष्काळाबाबत प्रतिक्रिया देताना अश्लील व्यक्त्तव्य केले होते. त्यानंतर राज्यभरात त्याच्या विरोधातील वादळानंतर राजीनाम्याबाबत अजित पवारांनी जाहीरपणे माफी मागितली.विरोधकांनी पवार यांच्या राजीनाम्याची मागणी करीत राज्यभरात निर्दशने केली.

दरम्यान पवार हे गुरुवारी फलटण शहरात नगरपालिकेच्या पाणी पूरवठा योजनेच्या उदघाटनासाठी आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राजीनाम्याबाबत छेडले असता ते म्हणाले की, आपण केलेल्या व्यक्त्तव्यबाबत मी सभाग्रहात आणि तमाम महाराष्ट्रातील जनतेची जाहीरपणे माफी मागितली आहे. त्यामुळे राजीनामा देण्याचा विषय नाही. परंतु विधिमंडळातील आपल्या सहकार्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ असे त्यांनी स्पष्ट केल्याने पवार हे उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार का? याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान वाई तालुक्यात धोम धरण परिसरात एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असल्यामुळे धरणाचे नुकसान होत आहे.या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले की संबधित अधिकार्‍यांकडून माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल.