मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बेताल वक्तव्याची सर्वच स्तरातून निंदा करण्यात येत आहे. अजित पवारांच्या वक्तव्यावर अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील अजित पवारांचे कान टोचले. अजित पवारांना त्यांनी त्यांच्या खास शैलीत सल्लाही दिला.

अजितच चुकले होते, अजितने त्यांची माफीही मागितली पण चुकले हे बोलल्यानंतरच त्याच्या लक्षात आले असेल; असे मत व्यक्त करून नाना म्हणाले की; प्रत्येकाचे काही तरी चांगले, वाईट गुण असतात. तर अजित यांनी बोलणे, भाषण करणे… हा त्यांचा स्ट्राँग पाईंट नाही. कदाचित काम करणे असेल. जो आपला स्ट्राँग पॉईंट आहे तिथे आपण आपल्याला सिद्ध करावे.बाकीच्या गोष्टीत नाही; असा सल्ला नानांनी दिला.
आपण अनावधानाने काहीवेळा बोलून जातो, तसे करू नये. निश्चितपणे शब्द हे तुम्हांला फार विचित्र कुठल्या कुठे नेऊन ठेवतील. वर नेतील खाली नेतील; असे म्हणत नाना पाटेकर यांनी अजित पवारांना सबुरीचा सल्ला दिला आहे.
अजित पवारांच्या वक्तव्याचा सगळ्यांनीच निषेध केल्यानंतर अजित पवारांनी त्याबाबत माफीही मागितली. मात्र अजित पवारांच्या या वक्तव्याचे पडसाद विधानसभेतही उमटले. विरोधकही चांगलेच आक्रमक झाले.