सातारा: केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या सल्ल्यानंतर उपराकार लक्ष्मण माने पोलिसांना शरण आले आहेत. लक्ष्मण माने यांच्यावर त्यांच्याच संस्थेतील महिलांनी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. मात्र माने गेले १५ दिवस फरार होते.
लक्ष्मण माने यांनी पोलिसांना शरण यावे, असा सल्ला शरद पवार यांनी कालच दिला होता. माने यांनी त्वरित पोलिसांसमोर हजर राहून आपली भूमिका मांडावी, असे शरद पवारांनी सांगितले. माने यांनी पोलिस चौकशीपासून दूर राहणे अतिशय चुकीचे आहे. यामुळे मानेंविरुद्ध सगळीकडे चर्चा रंगत आहे. मानेंच्या अशा वागण्यामुळे सत्य-असत्याच्या संघर्षात असत्याचा विजय झाल्याचे जाणवते, असेही पवार म्हणाले.
माने यांच्यावर अशाप्रकारचे गंभीर आरोप होऊनही ते पोलिसांसमोर हजर झाले नव्हते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल शंका निर्माण होऊन, त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत होती. लक्ष्मण माने यांच्यावर लैंगिक शोषणाचे एकूण सहा गुन्हे दाखल झाले आहेत.