
नवी दिल्ली, दि. ८ – राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दयेची याचिका फेटाळल्यानंतर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महिलेला फाशी देण्यात येणार आहे. सोनिया असे या महिलेचे नाव असून, तिचा पती संजीव यालाही याप्रकरणी फाशीची शिक्षा जाहीर करण्यात आली आहे. सोनियाने आपल्या कुटुंबातील आठ लोकांची हत्या केली होती. यामध्ये आई-वडिलांचादेखील समावेश आहे. फाशी देण्याची तारीख हिसारच्या सत्र न्यायालयाकडून निश्चिित करण्यात येणार आहे.
