सध्या सर्वत्र ‘शूटआउटएट वडाला’ या सिनेमातील सनी लियोनच्या आयटम सॉन्ग ‘लैला तेरी ले लेगी’ याची चर्चा जोरात सुरु आहे. या गाण्यामध्ये अभिनेता तुषार कपूर सुद्धा झळकणार आहे. त्यामुळे आगमी काळात येत असलेल्या या आयटम सॉन्गची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. मात्र या आयटम सॉन्ग मुळेच सध्या सनी लियोनचा तुषार कपूर प्रशंसक झाला आहे.
या आयटम सॉन्गबाबत बोलताना तुषार म्हणाला, ‘ तसे पाहीले तर मी आइटम सॉन्गचा मोठा फैन आहे. ‘चोली के पीछे क्या है’ हे गाणे रिलीज झाले त्यावेळी मी १६ वर्षाचा होतो. त्याशिवाय लहनपणी ‘ताकी ओ ताकी’, ‘बाप की कसम, मां की कसम’ आणि ‘झोपड़ी में चारपाई’ सारखे गाणे ऐकले होते. ‘शूटआउट एट वडाला’ मध्ये दोन आयटम सॉन्ग आहेत. हे दोन्हीपण आयटम सॉन्ग हिट होतील अशी अपेक्षा आहे.’
अभिनेत्री सनी लियोनचा अंदाज विजेता सारखा आहे. तिला हे आयटम सॉन्ग ऑफर केले. त्यावेळी तिने हे मोकळेपणाने केले, इतर अभिनेत्रीसारखी ती नखरेबाज नाही. त्या गाण्यातील सनी अशी लैला आहे की तिने माझे ह्र्दय जिंकले आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून मी तिचा प्रशंसक झाला असल्याचे तुषारने स्पष्ट केले.