एमपीएससी परिक्षा अखेर पुढे ढकलली

मुंबई:’व्हायरस’मुळे झालेला गोंधळ निस्तरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली. ही परीक्षा मी महिन्यात होणार असून त्याची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

एमपीएससीच्या संकेतस्थळात ‘व्हायरस शिरल्याने या वर्षीच्या परीक्षार्थींची माहितीच नष्ट झाली. ही माहिती पुन्हा ऑनलाईन भरण्यास उमेदवारांना सांगण्यात आले. मात्र एकाच वेळी लाखो परीक्षार्थी ही माहिती भरण्यासाठी या संकेतस्थळाचा वापर करीत असल्याने हे संकेतस्थळ ठप्प होऊ लागले.

विद्यार्थ्यांची नाराजी असूनही लोकसेवा आयोगाचा परीक्षा पुढे न ढकलण्याकडे काळ होता. मात्र याबाबत विधीमंडळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक होऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.