
पुणे दि ४ : लाइफ ऑफ पाय चित्रपट पाहिलात ! त्यातील रिचर्ड पार्कर म्हणजे ढाण्या बंगाली वाघ आठवतोय ! या चित्रपटातील केवळ २४ दृश्ये खराखुरा वाघ आणून चित्रित झाली मात्र इतर सर्व दृश्यात कमाल दिसली ती ऑटोडेस्क या कंपनीच्याची सोफ्टवेअर प्रणाली. अनिमेशन असो की रशियातील शहरी रेल्वे मार्गाचा विस्तार जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात रचना, विकास आणि प्रत्यक्ष प्रारूप यासाठी कंपनीने विकसित केलेल्या प्रणाली वापरल्या जात आहेत.
बांधकाम आरेखनापासून ते शहराच्या विकास प्रक्रियेला लागणाऱ्या सिम्युलेशन पर्यंत अनेक प्रकारची नवी सोफ्टवेअर आज कंपनीने बाजारपेठेत सादर केली.
याबाबत व्यवस्थापकीय संचालक प्रदीप नायर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले की माध्यम, करमणूक , शिक्षण, दळणवळण, सोशल मिडिया अशा नव्या क्षेत्राला लागणारी प्रणाली आम्ही विकसित केली आहे. जगभरात आमचे एक कोटीहून अधिक ग्राहक असून आता भारतातील पायाभूत सुविधा उद्योगापासून डिजिटल माध्यमांना लागणाऱ्या सुविधा आम्ही देत आहोत. अनेक ऑस्करविजेत्या चित्रपट निर्मितीत आमची प्रणाली वापरली जाते आहे तसेच वाहन उद्योगात तिचा वापर परिणामकारक केला जातो आहे.
