ऑडीची सर्वाधिक वेगवान कार 4 एप्रिलला भारतात लाँच

नवी दिल्ली दि.1 – जर्मन कार उत्पादक कंपनी ऑडी त्यांची सर्वाधिक वेगवान कार ऑडी आर 8-व्ही10 एप्रिलच्या चार तारखेला भारतात लाँच करणार असल्याचे कंपनीतील विश्वसनीय सूत्रांकडून समजते. ही गाडी सुपरकार साठी आदर्श मानल्या जाणार्‍या बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवरज लाँच केली जाईल असे सांगण्यात येत आहे.

ऑडीची ही सुपरकार 317 किमी प्रतितास या वेगाने धावू शकणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या गाडीची किंमत 18600 युरो म्हणजेच 13 लाख भारतीय रूपये अशी ठरविली गेली असून ही किंमत त्यांच्या अगोदरच्या ऑडी व्ही 10 पेक्षा थोडी जास्त आहे.