पुणे, दि. 25 (प्रतिनिधी) – रेल्वेने येत्या एक एप्रिलपासून आरक्षित तिकीट रद्द करण्याच्या दरामध्ये वाढ केली आहे. नव्या दरानुसार सेंकड क्लाससाठी 30 रुपये , स्लिपरक्लाससाठी 60 रुपये , एसी चेअर कार , थर्ड एसी इकॉनॉमी आणि थर्ड एसीसाठी 90 रुपये आकारण्यात येणार आहे. मर्स्ट क्लास आणि एसी टू टिअरचे आरक्षित तिकीट रद्द करण्यासाठी 100 रुपये द्यावे लागणार आहेत , तर एसी मर्स्ट क्लास आणि एक्झीकेटीव्ह क्लासचे तिकीट रद्द करण्यासाठी 120 रुपये आकारण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून कळविण्यात आले आहे.
