गेल्या काही दिवसापासून दिग्दर्शक एकता कपूरसाठी अभिनेता शाहरुख खान आणि अजय देवगन डोकेदुखीचे ठरत आहेत. एकता कपूर त्यांच्यावर खूपच नाराज आहे. एकताच्या सिनेमासोबतच आगामी काळात यूटीवीचा ‘हिम्मतवाला’ आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’ हे सिनेमे रिलीज होत आहेत.
शाहरुख,अजयमुळे एकताची डोकेदुखी
‘हिम्मतवाला’ आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’ या सिनेमासाठी डिस्ट्रीब्यूटर्सने जास्तीत जास्त सिंगल स्क्रीन थियेटर बुकिंग केले आहेत. त्यामुळे आगामी काळात एकताच्या ‘शूटआउट एट वडाला’, ‘एक थी डायन’, ‘लुटेरा’, ‘रागिनी एमएमएस -२’ हे सिनेमे रिलीज करणे अवघड झाले आहे. बरेच सिनेमाहाल खूप दिवसापासून बुक केले आहेत.
सुपरस्टार्स शाहरुख व अजय देवगन यांचे सिनेमे यूटीवी मोशनकडे, डिस्ट्रीब्यूटर्ससाठी आहेत. एकताकडे अक्षय कुमारचा ‘वन्स अपन अ टाइम इन मुंबई अगेन’ हा सिनेमा आहे त्याच्या आधारावरच एकता सध्या खेळ खेळत आहे.
