टीम इंडियाची दमदार ओपनिंग

नवी दिल्‍ली- कांगारुने केलेल्या २६२ धावांला उत्तर देण्‍यासाठी मैदानात आलेल्‍या टीम इंडियाच्‍या सलामीवीरांनी दमदार ओपनिंग केली आहे. पुजाराने मुरली विजयच्‍या साथीने डावाची सुरूवात करीत शतकी भागीदारी केली. शेवटचे वृत्त हाती आले टीम इंडियाने बिनबाद १०५ धावा केल्‍या होत्या .

शनिवारी दुस-या दिवशी कांगारुचा पहिला डाव १२ षटकातच संपला. पीटर सिडलने पहिले अर्धशतक केले. सिडल आणि पॅटिन्‍सनच्‍या मौल्‍यवान खेळीमुळे कांगारूंना २५० धावांचा टप्‍पा ओलांडता आला. पीटर सिडल आणि जेम्‍स पॅटिन्‍सनला फोडण्‍यात फिरकीपटू आर. अश्‍विनला यश आले. अश्विनने सिडलचा त्रिफळा उडवला. सिडलने५१ धावा केल्‍या. सिडलच्‍या विकेटबरोबर अश्विनने मालिकेत पुन्‍हा एकदा पाच विकेट घेतल्‍या. पाच विकेट घेण्‍याची त्‍याची ही नववी वेळ आहे.जेम्‍स पॅटिन्‍सनला बाद करीत प्रग्‍यान ओझाने आपल्‍या शंभराव्‍या बळीची नोंद केली.ऑस्‍ट्रेलियाने सर्वबाद २६२धावा केल्‍या.

टीम इंडियाकडून अश्विन पाच , ईशांत शर्मा आणि रवींद्र जडेजाने २-२ तर प्रग्‍यान ओझाने एक विकेट घेतली. ऑस्‍ट्रेलियाकडून पीटर सिडल ५१, स्‍टीवन स्मिथ ४६, फिलीप ह्यूज ४५, कोवान ३८ आणि पॅटिन्‍सनने ३० धावा केल्‍या.