संतोष माने मनोरुग्ण असल्याचा त्याच्या वकिलाचा दावा

पुणे, दि. 22 (प्रतिनिधी) – संतोष माने मनोरुग्ण आहे. माने याने केलेले कृत्य वेडाच्या भरात केले आहे. त्या घटनेत मृत किंवा जखमी झालेल्या लोकांबरोबर त्यांचे शत्रूत्व नव्हते. त्यामुळे भारतीय दंड सहिता कलम 84 नुसार निर्दोष सुटण्यास माने पात्र आहे, असा युक्तीवाद बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. धनंजय माने यांनी केला.
जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सरकारी पक्षातर्मे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वला पवार काम पाहत आहेत. तर बचाव पक्षातर्मे अ‍ॅड. धनंजय माने, अ‍ॅड. जयदीप माने, अ‍ॅड. ऋषीकेश गानू आणि अ‍ॅड. प्रदीप पवार काम पाहत आहेत. शुक्रवारी बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. धनंजय माने यांनी युक्तीवाद केला.
संतोष माने याची मानसिक स्थिती बरोबर नाही. घटनेच्या दिवशी आपण काय करत होतो, याचे भान त्याला नव्हते. भानामती केल्याचा भास त्याला सतत होत असतो. कानात मृदंगाचे आवाज येत असतात. त्या दिवशी गाडी हवेत उडत होती, असे त्याला वाटत होते. त्याला जिवाची भीती नव्हती. त्यामुळे गोळीबार केला तरीही तो थांबायला तयार नव्हता. घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या नागरिकांशी त्याचे शत्रूत्व नव्हते. विनाकारण कोण कशाला मारेल, असा युक्तीवाद अ‍ॅड. माने यांनी न्यायालयात केला. घटनेनंतर दुसर्‍या दिवशी ससून येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ्नटरांनी आणि 27 जानेवारी रोजी येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालय येथे मानेची तपासणी करण्यात आली होती. मात्र, सरकारी पक्षाच्या वतीने दोन्ही ठिकाणच्या डॉ्नटरांची साक्ष न्यायालयात घेण्यात आली नाही.
सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार लोणकर याने संतोष माने याला पकडले होते. मात्र, माने याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्यावेळी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या रिमांडवर त्याचा उल्लेख नाही. शरीम महंमद कुट्टी आणि संतोष हेंद्रे यांनी घटनेचा पंचनामा केला होता. मात्र, त्या पंचनाम्यात लोणकर यांनी संतोष माने याला पकडल्याचा उल्लेख केला नाही. लोणकर यांनी जबाबावर सही केल्याचे साक्षीदरम्यान सांगितले होते. मात्र, न्यायालयतात सादर केलेल्या जबाबावर लोणकरची सही नाही. यावरून लोणकर यांना पोलिसांनी खोटा साक्षीदार म्हणून उभे केले असल्याचे दिसून येत आहे. घटनेनंतर सहायक पोलीस निरीक्षक हांडोरे यांना सोलापूर येथे संतोष माने याचे डॉ्नटर दिलीप भुरट यांची चौकशी करण्यासाठी पाठविले होते. तरीही सरकारी पक्षातर्मे हांडोरे यांची साक्ष घेण्यात आली नाही, असेही अ‍ॅड. माने यांनी युक्तीवादादरम्यान सांगितले.