
नवी दिल्ली दि. १९ – अनेक आफ्रिकी देशांनी भारतीय औषध निर्माण तसेच वैद्यकीय सेवा क्षेत्राने आफ्रिकी देशांत गुंतवणूक करावी अशी अपेक्षा नवव्या भारत आफ्रिका परिषदेत व्यक्त करण्यात आली आहे. या परिषदेला ४५ आफ्रिकी देशातील ९०० प्रतिनिधी उपस्थित आहेत.

नवी दिल्ली दि. १९ – अनेक आफ्रिकी देशांनी भारतीय औषध निर्माण तसेच वैद्यकीय सेवा क्षेत्राने आफ्रिकी देशांत गुंतवणूक करावी अशी अपेक्षा नवव्या भारत आफ्रिका परिषदेत व्यक्त करण्यात आली आहे. या परिषदेला ४५ आफ्रिकी देशातील ९०० प्रतिनिधी उपस्थित आहेत.
टांझानियाचे आरोग्यमंत्री हुसेन अली या वेळी बोलताना म्हणाले की भारताने आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करावीच पण आमच्या देशांना रास्त दरात औषधे पुरवावीत अशी अपेक्षा आहे. मध्यमवर्गीयांना चांगली आरोग्य सेवा मिळण्यासाठी भारतीयांनी टेलिमेडिसिन सारख्या क्षेत्रातही सहकार्य केले तर कमी दरात आरोग्य सेवा आम्हाला उपलब्ध करून देता येईल. भारत सध्या असे एक केंद्र टांझानियात चालवित आहे.
मोझांबिकचे आरोग्यमंत्री अलेक्झांडर मंगुल म्हणाले की आमच्या देशातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी भारतीय औषध कंपन्यांनी पाठिबा द्यावा अशी आमची विनंती आहे. खासगी अथवा सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रातील कंपन्या आमच्या देशांत गुंतवणूक करू शकतील. आमची आरोग्य सेवेची गरज मोठी असून सध्या त्यापैकी फत्त* ४० टक्के इतकीच गरज पुरी होत आहे.
इथिओपियाचे आरोग्य मंत्री केबेड वॉस्क्यू म्हणाले की आमच्याकडे कॅन्सर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब या व्याधींनी अनेक नागरिक ग्रस्त आहेत. त्यासाठी भारताने परवडणार्या दरात या व्याधींवरील औषधे आम्हाला पुरवावीत अशी अपेक्षा आहे. आमच्याकडे ७५ ते ८० टक्के औषधे व १०० टक्के वैद्यकीय उपकरणे आयातच करावी लागत आहेत.
त्यावर बोलताना मेदांता मेडिसिटी हॉस्पिटल गुरगांवचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नरेश चौहान म्हणाले की भारत आणि आफ्रिकी देशांनी पारंपारिक आणि पाश्वात्य औषध पद्धतीचा योग्य मेळ घातला पाहिजे. भारतात सध्या ४८ लाख जणांना प्राथमिक आरोग्यसेवक म्हणून प्रशिक्षित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून हे आरोग्यसेवक पुढच्या १० वर्षात कार्यरत होतील अशी अपेक्षा आहे.