मुंबई दि.१९ – दूरसंचार क्षेत्रात झालेली क्रांती आणि भारतभर मोबाईल ग्राहकांचे वाढत चाललेले जाळे याचा फायदा पोस्टाने आपली मनीऑर्डर सेवा सुधारण्यासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या सेवेमुळे मनीऑर्डर अगदी जलद संबंधित व्यक्तीला मिळू शकणार आहे.

पोस्टाने पाठविलेली मनीऑर्डर मिळण्यास यापूर्वी किमान तीन ते चार दिवस लागत असत. त्यानंतर पोस्टाने सुरू केलेल्या इलेक्ट्रोनिक मनीऑर्डर सेवेमुळे हा कालावधी एक दोन दिवसांवर आला होता. मात्र आता नव्या सेवेमुळे हा कालावधी कांही तासांवरच येऊ शकणार आहे. यात मनीऑर्डर करणार्या व्यक्तीला पोस्टात पैसे आणि फॉर्म भरून दिल्यानंतर एक कोड नंबर दिला जाणार आहे. हा नंबर संबंधित व्यक्तीला एसएमएस करून मनीऑर्डर करणाऱ्याने पाठवायचा आहे. पोस्टातूनही हा नंबर संबंधित गावाच्या पोस्ट कार्यालयातील प्रमुखांकडे पाठविला जाणार आहे.
त्यानंतर एसएमएस मिळाला की संबंधित व्यक्तीने पोस्टात जाऊन हा मेसेज दाखविला की त्याला पैसे दिले जाणार आहेत. अर्थात त्यासाठी संबंधित व्यक्तीला पोस्टात जावे लागेल. पोस्टाकडे सध्या कर्मचाऱ्याची कमतरता आहेच. त्यामुळे या नव्या सेवेमुळे पोस्ट विभागालाही कर्मचारी केवळ या कामासाठी अडकवून ठेवावे लागणार नाहीत असे सांगण्यात येत आहे.