अहमदाबाद दि.१८ – गेल्या वर्षीच्या अखेरी गुजराथ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूका दरम्यान नरेंद्र मोदींनी वापर केलेल्या थ्रीडी प्रसारणाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेतली गेली असल्याचे नरेंद्र मोदी यांनीच ट्वीटरवरून जाहीर केले आहे.

गुजराथ निवडणुकांसाठी प्रचार करताना मेादींनी थ्रीडी प्रसारणाचा आधार घेतला होता आणि त्यामुळे हा प्रचार संस्मरणीय ठरला होता. एनचांट या कंपनीने यासाठी खास सोय केली होती आणि त्यामुळे १० डिसेंबर रोजी मोदींचे ५५ मिनिटांचे भाषण एकाचवेळी ५३ स्थळांवर दिसू शकले होते. युरोपमध्ये ही पद्धत मॅडोना, मारिया कॅरी या सारख्या कलाकारांनी वापरली आहे मात्र एकचवेळी सर्वाधिक जागांवर हे प्रसारण दिसण्याचे रेकॉर्ड मात्र गुजराथ प्रचारात रचले गेले आहे.
मोदींनी ट्वीटरवरून एनचांट कंपनीचे राज रेड्डी आणि मणिशंकर यांना गिनिज बुकने थ्रीडी प्रसारणाबाबत नोंद केल्याचे दिलेले सर्टिफिकेट अपलोड केले आहे. त्यानुसार या दोघांना थ्रीडी होलोग्राफिक प्रोजेक्शन तंत्रज्ञान एकाचवेळी सर्वाधिक जागी वापरल्याबद्दल हे सर्टिफिकेट दिले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.