रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी बँक ऑफ अमेरिका कार्पोच्या संचालक मंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. संचालक मंडळात दोन नंबरवर असलेले अंबानी भागभांडवल धारकांची वार्षिक सभा झाल्यानंतर मे महिन्यात हे पद सोडत आहेत असे सांगितले जात आहे. अंबानी यांना मार्च २०११ मध्ये संचालक मंडळात घेतले गेले होते आणि त्यांच्या जागतिक अनुभवाचा चांगला फायदा बँकेला मिळाला होता असेही सांगितले जात आहे.
अंबानी या पुढे याच बँकेच्या नॉन फिड्युशिअरी ग्लोबल अॅडव्हायझरी कौन्सिलवर काम करणार आहेत. यात उद्योगपती, शिक्षण तज्ञ आणि नियोजन तज्ञांचा समावेश आहे. पंचावन्न वर्षीय अंबानी यांनी मॉर्गन स्टॅनलेच्या एक्झिक्युटिव्ह रॉर्बट स्कली बरोबरच संचालक मंडळातून बाहेर पडणार असल्याचे संकेत दिले होते. या १८ जणांच्या संचालक मंडळात त्यामुळे ऑगस्टपासून सहा नवे संचालक घेतले गेले आहेत. संचालक मंडळातून निवृत्तीचे अधिकृत वय ७२ आहे.
अंबानी यांनी संचालक मंडळातून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयत्ति*क निर्णय असल्याचे बँक ऑफ अमेरिकाच्या प्रवक्तयाने सांगितले.