ऊस कारखान्यांनी बियाणे व पाण्यासाठी मदत करावी-शरद पवार

पुणे,दि.17(प्रतिनिधी)-राज्यात सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून ऊस उत्पादनाचा सर्वाधिक फटका सोलापूर जिल्ह्याला बसणार आहे. यंदाच्या वर्षी उजनी धरण कोरडे पडल्याने पुढील हंगामात ऊसाचे गाळप फाारसे होणार नाही. ऊस लागवडीसाठी आवश्यक ते बियाणे उपलब्ध करुन देण्याचा प्रश्‍न गंभीर असून ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, अशा कारखान्यांनी बियाणे व पाणी उपलब्ध करण्याच्या कामात पुढाकार घ्यावा असेकेंद्रीय कृषीमंंत्री शरद पवार यांनी वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटच्या बैठकीत सांगितले.
व्हीएसआयच्या नियामक मंडळाची बैठक साखर संकुल येथे पवार यांच्या उपस्थितीत झाली. उपमु‘यमंंत्री अजित पवार, व्हीएसआयचे उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, महासंचालक शिवाजीराव देशमुख, साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहीते पाटील, कलप्पा अण्णा आवाडे, अजित बाबर, रेणुका शुगरचे नरेंद्र मुरकुंबी यांच्यासह अन्य सभासद यावेळी उपस्थित होते.यावेळी केंद्रीय कृषिमंत्री आणि वसं्तदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती आहे.पिण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोत राखीव ठेवण्यात आले आहे. शेतीसाठी दिल्या जाणार्‍या पाण्यापैकी साठ टक्के पाणी हे केवळ उसासाठी लागते. राज्यातील पाण्याची असलेली उपलब्धता लक्षात घेता पुढील काळात उसाला ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही. ठिबक सिंचनासाठी साखर कारखान्यांनी विशेष प्रयत्न करावेत, अशा सुचना यांनी उपस्थितांना दिल्या.
उसाच्या संशोधनासाठी व्हीएसआयचीमांजरी येथील जागा कमी पडत असल्याने संस्थेच्या विस्तारिकरणासाठी दौंड तालुक्यातील मलठण येथे 109 एकर जागा घेतली आहे. पंधरा कोटी रुपयांची ही जागा असून या जागेची मोजणी पूर्ण झाली आहे. पुढील महिन्या्त ही जागा ताब्यात घेणार आहे.जालना आणि इतर शहरातही संशोधनासाठी जागा घेण्याचे प्रयत्न सुरु आहे.पुढील हंगामात दुष्काळी स्थितीमुळे 400 ते 500 लाख टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज या बैठकीत व्यक्त करण्यात आला. यंदा हे गाळप 760 लाख टन एवढे झाले आहे.