धडाकेबाज पर्दापण करणार्याR शिखर धवनने अवघ्या १६८ चेंडूत नाबाद १८५ धावांची विक्रमी खेळी करून टीम इंडियाला मजबूत स्थितीत पोचवले आहे. आपल्या शतकात धवनने तब्बल ३३ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी केली. दुसरा सलामीवीर मुरली विजयनेही नाबाद ८३ धावा केल्या. या दोघांच्या जबरदस्ती खेळीमुळे टीम इंडियाने दिवसअखेर बिनबाद २८३ धावा बनवल्या.
ज्या विकेटवर भारतीय फिरकीपटूंनी कमाल केली त्याच विकेटवर कांगारूचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. एकाही गोलंदाजाला विकेट मिळवण्यात यश आले नाही. शिखर धवनने पर्दापणात सर्वाधिक ३३ चौकार मारून एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. ऑस्ट*ेलियाच्या ४०८ धावांची आघाडी पार करण्यासाठी टीम इंडियाला १२५ धावांची गरज असून सामन्याचे अद्याप दोन दिवस शिल्लक आहेत.
तत्पूर्वी, शतकवीर शिखर धवन पाठोपाठ मुरली विजयनेही पाच चौकारांच्या मदतीने अर्धशतक ठोकले. सलामीवीरांनी टीम इंडियाला धडाकेबाज सुरूवात करून दिली. धवनने केवळ ८५ चेंडूमध्येच ३१ चौकारांसह शतक पूर्ण केले. हे पदार्पणातील सर्वात वेगवान शतक ठरले. पदार्पणातच शतक ठोकणारा तो भारताचा १३ वा फलंदाज ठरला आहे.
धवन सुरुवातीला सावध होता. परंतु, स्थिरावल्यानंतर त्याने मनसोत्त* फटकेबाजी केली. एक चुकीचा फटका वगळता त्याने अप्रतिम फटकेबाजी केली. त्याच्या खेळीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने गॅप्स शोधून शॉटस खेळले. अचानक फटकेबाजीला सुरुवात केल्यानंतर कांगारुही गोंधळले. तर दुसरीकडे विजयनेही नॅथन लियॉनला उत्तुंग षटकार ठोकले. परंतु, नंतर त्याने धवनलाच जास्त स्टाईक दिली आणि एक बाजू लावून धरली.