काजोलची आयटम सॉंग करण्याची इच्छा

काजोल हे सिनेक्षेत्रातील असे नाव आहे की रील लाइफ मध्ये नव्हे तर रीयल लाइफमध्ये सुद्धा प्रेक्षकांचे मने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. सिनेक्षेत्रात नंबर वनचे सिंहासन काबीज करणारी परिपक्व अभिनेत्री म्हणून तिने करियरची सुरुवात केली. त्यानंतर तिने अजय देवगन सोबत लग्न करून घर सुद्धा बसविले आहे. त्यानंतर तिने पारिवारिक जीवनात मातृत्वचा आनंद घेतल्यानंतर तिने सिनेमात पदार्पण केले होते.

अभिनेत्री काजोल म्हणाली, ‘ आगामी काळात जर सिनेमामध्ये आयटम सॉंग करण्याची संधी मिळाली तर कुठलीच अट न घालता हे आयटम सॉंग करणार. तसे पहिले तर मला सिनेमातील आयटम सॉंग आवडत नाहीत. मात्र सध्या मुलासोबत आयटम सॉंग बघण्यात आल्याने आवड निर्माण झाली आहे. ‘

काजोलने या सर्व बाबीचा उलगडा फिक्की फ्रेम्स, २०१३ च्या प्रसंगी दिग्दर्शक करण जौहर सोबत चर्चा करतान केला. रीयल लाइफमध्ये ती करणला आपला भाऊ समजते. मात्र करण काजोलला अजूनपण एक शर्मिली अभिनेत्री समजतो. तसे पहिले तर करणसाठी काजोल लकी चार्म आहे. त्यामुळे आगामी काळात करणच्या सिनेमात काजोल आयटम सॉंग तर करणार नाही ना अशी चर्चा ऐकावयास मिळत होती.

Leave a Comment