मुलामध्येच बिजी जूही

अभिनेत्री जूही चावलाने गेल्या काही दिवसांपासून सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला असला तरी सध्या ती जास्तीत जास्त काळ मुलामध्येच बिजी असते. तिला मुलाच्या खाण्यापिण्यावर जास्त लक्ष द्यावे लागते. सध्या ती अभिनेत्री माधुरी दीक्षित सोबत ‘गुलाब गैंग’ या सिनेमात काम करित आहे.

अभिनेत्री जूही सध्या केलोग्सच्या जाहिरातीची शूट करीत आहे. यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना जुही म्हणाली, ‘ गेल्या काही दिवसापासून मी शूट करीत असून त्यासोबतच मी मुलाकडे पण लक्ष देत आहे. त्यांनी पौष्टिक भोजन करावे याकडे मी लक्ष देत असते. तसे पाहिले तर जानवीला आणि अर्जुनला पण नवीन-नवीन गोष्टी खान्यासाठी आवडतात. त्यामुळे माझा अधिकतर वेळ हा दोन्ही मुलांच्या देखभालीत जातो. शूट मधून मिळालेला वेळ मी मुलासोबतच घालवीत असते.’

सध्या जूही गेल्या काही दिवसापासून दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या ‘गुलाब गैंग’ या सिनेमाच्या शूट मध्ये बीजी आहे. या सिनेमात तिच्यासोबत धक धक गर्ल माधुरी दीक्षित काम करीत आहे. सिनेसृष्टीत पुनरागमन केल्यानंतर जुहीचा हा पहिलाच सिनेमा असल्याने या सिनेमातील अभिनयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.