कांगारूचे नाराजी नाट्य; कारवाईवर टीका

मोहाली- दुस-या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवाची कारणे ऑस्‍ट्रेलियाच्‍या संघ व्‍यवस्‍थापनाने खेळाडूंना विचारली होती. त्या दिलेल्‍या आदेशाचे पालन न केल्‍यामुळे सोमवारी वॉटसनसहित चार खेळाडूंना तिस-या कसोटीतून डच्‍चू देण्‍यात आला.

या तडकाफडकी कारवाईमुळे कांगारूचे खेळाडू नाराज झाले आहेत. या नाराजीतून उपकर्णधार शेन वॉटसन मायदेशी परतला. दरम्यान, चार खेळाडूंना तिस-या कसोटीतून वगळण्याच्या या निर्णयावर ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटूंकडून टीका केली जात आहे.

संघातून वगळलेल्‍या खेळाडूंमध्‍ये वॉटसन, जेम्‍स पॅटिन्‍सन, उस्‍मान ख्‍वाजा आणि मिशेल जॉन्‍सचा समावेश आहे. प्रोटोकॉल तोडल्‍यामुळे टीम इंडियाविरूद्धच्‍या १४ मार्चपासून सुरू होणा-या कसोटीतून वगळल्‍यानंतर ऑस्‍ट्रेलियाचा उपकर्णधार शेन वॉटसन संघ व्‍यवस्‍थापनावर नाराज होऊन मायदेशी परतलाआहे. मात्र, तो आपली गर्भवती पत्‍नी ली फर्लांगच्‍या देखभालीसाठी मायदेशी गेला असल्‍याचे क्रिकेट ऑस्‍ट्रेलियाच्या सूत्राने म्हटले आहे.

ऑस्‍ट्रेलियाच्‍या संघ व्‍यवस्‍थापनाचा हा निर्णय चुकीचा असून या निर्णयावर सर्वच ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटूंनी कडाडून टीका केली आहे. त्यामध्ये ऑस्‍ट्रेलियाचा माजी कर्णधार अलन बॉर्डर, टीम मुडी, शेन वार्न, इयान चॅपेल, मार्क वॉ यांचा समावेश आहे. दरम्यान ऑस्‍ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर व कर्णधार मायकेल क्लार्क यांनी मात्र या कारवाईचे समर्थन केले आहे.

Leave a Comment