मी रॅट रेसमध्ये नाही – सोनम

नवी दिल्ली – आपले एकामागून एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटल्यावर अभिनेत्री सोनम कपूरला आता साक्षात्कार झाला आहे. आपण या सर्वातून धडा घेतला असून रॅट रेसमध्ये सहभागी न होता यापुढे समाधान देणार्‍या भूमिकाच निवडण्याचा निर्णय घेतल्याचे सोनमने सांगितले.

सोनम म्हणाली की, दोन वर्षापूर्वी एक-दोन चित्रपट करून मी मार्ग चुकले. त्यामुळे काही विशिष्ट प्रकारचे चित्रपटच करण्याचा निर्णय घेतला. परंतु ज्या पद्धतीने हिंदी चित्रपटसृष्टी वाढत होती, त्यातून माझ्या पदरी निराशाच पडली. मी चुकीच्या दिशेने वाहवत गेले. मात्र आता आपल्याला नंबर वनची अभिनेत्री बनायचे नसून आपण रॅट रेसमध्येही नाही. कलाकार म्हणून जे चित्रपट मला समाधान देतील तेच करण्याचा निर्णय मी घेतला आहे. मग असे चित्रपट मोठया बॅनरचे तसेच प्रसिद्ध दिग्दर्शकाचे नसले तरी माझी भूमिका चांगली असेल तर मी ते नक्कीच स्वीकारीन, असे सोनमने सांगितले.

सोनमचे नुकतेच प्रदर्शित झालेले ‘थँक यू’, ‘मौसम’ आणि ‘प्लेयर्स’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा गल्ला जमवू शकले नाहीत.