म्यानमारच्या विरोधी पक्षनेतेपदी स्यू की

यांगून- म्यानमारच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी या विरोधी पक्षाच्या प्रमुखपदी नोबेल विजेत्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यू की यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

सन २०१५ मधील निवडणुकीत विजय संपादन करण्याच्या हेतूने पक्षाच्या १२० सदस्यांच्या मध्यवर्ती समितीने स्यू की यांची ही निवड केली आहे.

गेल्या वर्षी संसदेत दाखल होणार्‍या स्यू की यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. राजकीय शक्तीप्रदर्शनासाठी पक्षाचे हजारो कार्यकर्ते यांगूनमध्ये जमा झाले होते. समितीच्या बैठकीत पक्षासमोरच्या विविध आव्हानावरही चर्चा करण्यात आली.

Leave a Comment