बॉलीवूडचा टायगर सलमानने आतापर्यंत किती तरी अभिनेत्रीना ब्रेक दिला आहे. त्याच्या सोबत कोणती हिरोइन काम करते ती लाइम लाइटमध्ये येते. आगमी काळात येत असलेल्या सोहेल खानच्या मेंटल या सिनेमात अभिनेता सलमानच्या ओपोजिट एक नवीन चेहरा पहावयास मिळणार आहे.
सलमानची नवी हिरोइन डेजी शाह
मिळालेल्या माहितीनुसार ‘मेंटल’ या सिनेमात सलमानची नवीन हिरोइन डेजी शाह असणार आहे. यापूर्वी डेजीने ‘ब्लडी इश्क’ या सिनेमात आयटम सॉंग केले होते. सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार डेजी गणेश आचार्यच्या कोरियोग्राफर डांसिंग टीम मध्ये सुद्धा सह्बह्गी झाली होती. ती आता मेंटल सिनेमातून पहिल्यांदा डेब्यू करणार आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सलमानने एक इवेंटमध्ये डेजीचा परफॉरमेंस पहिला होता त्यामुळे तिची हिरोइन म्हणून निवड केली असल्याची चर्चा आहे. सलमानचा हा सिनेमा २ अक्टूबर रोजी रिलीज होणार आहे. सलमान आणि सोहेल या सिनेमात नवीन हिरोइन म्हणून डेजीला घेण्यचा विचार करीत आहेत.
