
मुंबई – नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्या आणि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसेंना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भातील माहिती स्वत: रोहिणी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. जळगावमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रोहिणी यांनी भाजपला धक्का देत त्यांचे वडिल एकनाथ खडसेंसोबत काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंना कोरोनाची लागण
माझी कोरोनाची चाचणी positive आली असून प्रकृती उत्तम आहे सावधता म्हणुन रुग्णालयात दाखल होत आहे.
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) November 15, 2020
रोहिणी खडसेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. प्रकृती उत्तम आहे. मात्र, खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होत आहे. गेल्या सहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोना चाचणी करून घ्यावी व स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहनही केले आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रोहिणी खडसे या अध्यक्षा आहेत. त्या जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातही सक्रिय आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर त्या निवडणूक रिंगणात होत्या. पण शिवसेनेच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला.
