‘विश्वरुपम’चा नवा विक्रम; २०० कोटींची कमाई

मुंबई: देशभर विरोधाचा सामना केल्यानंतर अभिनेता कमल हसन याचा ‘विश्वरुपम’ सर्वत्र प्रदर्शित झाला आणि अवघ्या काही दिवसांत या सिनेमाने जगभरात दोनशे कोटी रुपयांची कमाई करून दाखवली आहे. हा सिनेजगतातला आणखी एक विक्रम ठरला आहे.

अनेक वादानंतर तामिळनाडूमध्ये गेल्या सात फेब्रुवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने प्रेक्षकांची भरपूर वाहवा मिळवली. या सिनेमाच्या या नव्या रेकॉर्डबद्दल सिनेमाची अभिनेत्री पूजा कुमार हिने न्यूजर्सीमध्ये माहिती दिली आहे.

रहस्य आणि रोमांच उभे करणार्‍या या सिनेमात राहुल बोस तसेच ऑस्कर विजेता अभिनेता शेखर कपूर यांनी अभिनय केला आहे. उत्तर भारतात हा सिनेमा एक फेब्रुवारी रोजी हिंदी भाषेतून प्रदर्शित करण्यात आला होता.