स्ट्रगलिंग अभिनेत्रीवर स्पॉटबॉयने केला बलात्कार

मुंबई: आपण सिनेमा फायनान्सर असल्याचे भासवत स्पॉटबॉयनेच एका ’स्ट्रगलिंग’ अभिनेत्रीवर बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी मुंबईत घडली. मोठ्या बॅनरखाली काम मिळवून देण्याचे आमीष दाखवून २३ वर्षीय स्पॉटबॉयने अत्याचार केल्याची तक्रार या अभिनेत्रीने पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.

मुंबईमध्येच स्थायिक असलेली २२ वर्षीय पीडित मुलगी बॉलिवूडमध्ये पाऊल टाकण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून धडपडत होती. याच दरम्यान; पश्चिम उपनगरातील गोरेगावच्या मोतीलालनगर स्टुडिओच्या बाहेर तिची ओळख मुस्तफा अली खान याच्याबरोबर झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; या ’स्ट्रगलिंग’ अभिनेत्रीसमोर मुस्तफाने शारीरिक संबंधांची मागणी ठेवली.

त्याबदल्यात काम मिळवून देण्याचे आमीष त्याने या मुलीला दाखवले. मुस्तफाच्या सांगण्याप्रमाणे केल्यानंतरही या मुलीला सिनेमामध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही; तेव्हा तिने पोलिसांमध्ये मुस्तफा खानविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी मुस्तफाला अटक केली आहे.

Leave a Comment