टायगर झाला जपानमध्ये फेमस

भारतामध्ये अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित ‘एक था टाइगर’ हा सिनेमा खुपच सफल ठरला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटी पेक्षा आधिक कमाई केली आहे. त्या सिनेमाच्या आतापर्यंतच्या कलेक्शनने १०० कोटीचा आकडा केंव्हाच पार केला आहे. आतापर्यंत विदेशात फक्त अभिनेता शाहरुख खानची चर्चा जोरात होती. त्याचीच विदेशात जास्त होती, मात्र आत्ता काळ बदलला आहे. त्यामुळे आता सगळीकडे टायगरचा बोलबाला आहे.

यापूर्वीच्या काळात भारतात जरी शाहरुख खानचा सिनेमा चालला नसेल तरीपण त्याचा सिनेमा विदेशात मात्र चांगला बिजनेस करीत होता. आता मात्र काळ बदलला आहे. आता बॉलीवुडचा दबंग किंग खानला आव्हान देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता सलमान खानचा ‘एक था टाइगर’ हा सिनेमा ७ मार्च रोजी जपानमध्ये रिलीज होणार आहे. ही पहिली वेळ आहे की, अभिनेता सलमानचा सिनेमा जापानमध्ये रिलीज होत आहे.

तसे पहिले तर जपानमध्ये बॉलीवुडचा सिनेमा रिलीज होत नव्हता. साउथचा सुपर स्टार रजनीकांतच्या सिनेमाने जापानमध्ये धूम माजवली आहे. आता बॉलीवुडचे अभिनेते रजनीकांत आणि सलमान खान जापानमध्ये हिट ठरणार आहेत. सिनेमाचा डायरेक्टर कबीर खानने जापानमधील चार शहरात जाऊन सिनेमाचे प्रमोशन करणार आहे.