गेल्या काही दिवसापासून अभिनेत्ता अरशद वारसीची डिमांड बॉलीवूडमध्ये वेगाने वाढली आहे. काही दिवसापुर्वी त्याचा ‘जिला गाजियाबाद’ या सिनेमातून झळकल्यानंतर आता आगमी काळात लवकरच अरशद ‘जॉली एलएलबी’ या सिनेमात दिसणार आहे. त्यासोबतच त्याच्या ‘डेढ़ इश्किया’ या सिनेमाची शूटिंग नुकतीच सुरु झालीआहे. त्यामुळे सध्या कामात व्यस्त आहे. त्यासोबतच तो आतापर्यंत केलेल्या कामावर समाधानी आहे.
हैपी लाइफ इन्जॉय करतोय -अरशद
याबाबत अधिक बोलताना अरशद वारसी म्हणाला, ‘ मीडियाला नेहमीच गॉसिप कॉलम भरण्याची घाई असते. त्यामुळे प्रत्येकजण काही तरी रंगवून लिहित असतो. मी माझ्या फैमिली सोबत आनंदी आहे. सध्या मी हैपी लाइफ इन्जॉय करत आहे. पार्टीअथवा सिनेमात को-स्टार म्हणून काम करीत असताना थोडे असून बोलले की त्याचा अर्थ वेगळा काढला जातो. लगेचच टीवी चैनल आणि मैगजीनसाठी ही चटपटीत बातम्या होतात.’
गेल्या काही दिवसापासून या सिनेमाच्या शूटवेळी मिनीषा या को-स्टार सोबत मी काम करण्यापूर्वी जर चर्चा करीत असलो तर त्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे. या सिनेमात काही इंटिमेट सीन शूट करण्यात आले आहेत. त्यामुळे मीडियाला आणखीन एक हॉट बातमी मिळाली आहे.’हम तुम और घोस्ट’ या सिनेमाची शूटिंग दूरच्या लोकेशनवर केली आहे. त्यावेळी काही कीस सीन शूट करण्यात आल्या आहेत. मात्र या शुटवेळी माझ्या सोबत माझी पत्नी आणि मुलगी सोबत होते याची माहिती कदाचित नसल्याने माझ्याबाबत अफवा पसरविल्या जात आहेत.
