माधुरीने सुरु केली ऑनलाइन डान्स अकादमी

अभिनेत्री माधुरी दीक्षितने एक ऑनलाइन डान्स अकादमी सुरु केली आहे. या माध्यामातून तिला आगामी काळात तिच्या प्रशसंकाजवळ पोहचण्याची संधी मिळणार आहे. काही दिवसापूर्वीच माधुरीने तिच्या प्रशसंकासाठी ‘डान्स विद माधुरी दीक्षित डॉट कॉम’ ही डान्स अकादमी सुरु केली आहे.

माधुरीने नुकतीच वेबसाइट जारी केली आहे. या बाबत बोलताना माधुरी म्हणाली, ‘ माझी कित्येक दिवसापासूनची इच्छा होती की एक वेबसाइट तयार करण्याची ती या निमित्ताने पूर्ण झाली आहे. आणि दूसरे एक एप्लिकेशन तयार केले आहे. त्याचा मदतीने मला प्रशंसकाच्या जवळ जातजा येणार आहे. माझी प्रशंसकासाठी काही तरी करण्याची इच्छा होती. ती या निमिताने पूर्ण झाली आहे.’

माधुरी या वेबसाइटच्या माध्यमातून आगामी काळात तिच्या प्रशंसकाना नृत्य शैलिया शिकवणार आहे. या ठिकाणी एकाच छताच्या खाली सर्व प्रकारच्या डान्स शैली शिकावयास मिळणार आहेत. यामध्ये भारतीय, लोकनृत्य, शास्त्रीय व पाश्चात्य डान्स शिकण्यास मिळणार आहे. माधुरी सध्या आगामी काळात येत असलेल्या तिच्या ‘डेढ़ इश्किया’ आणि ‘गुलाब गैंग’ या सिनेमाच्या रिलीज होण्याची वाट पाहत आहे.

Leave a Comment