टीम इंडियाची विजयी सुरुवात

चेन्नई: कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे शानदार द्विशतक आणि फिरकीपटू आर. अश्‍विनच्‍या जबरदस्‍त गोलंदाजीच्‍या जोरावर टीम इंडियाने पहिल्‍या कसोटीत ऑस्‍ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवला. सोमवारी ऑस्ट्रेलियाच्या शेपटाने खेळ लांबविला. अन्यथा कांगारूंना कालंच डावाने पराभव स्वीकारावा लागला असता.

टीम इंडियाच्‍या पहिल्‍या डावातील ५७२ धावांना उत्तर देण्‍यासाठी दुस-यांदा फलंदाजीस उतरलेल्‍या ऑस्‍ट्रेलियाला २४१ धावांच करता आल्‍या. मंगळवारी खेळ सुरु झाल्यानंतर कालच्या धावात ऑसी फलंदजांनी केवळ दहा धावची भर घातली. त्यानंतर जडेजाने लायानला बाद केल्याने त्यांचा डाव संपुष्टात आला.

पाहुण्‍या संघाने दिलेले ५० धावांचे आव्‍हान टीम इंडियाने दोन्‍ही सलामीवीरांना गमावून पूर्ण केले. सचिन तेंडुलकर (नाबाद १३ धावा) आणि चेतेश्‍वर पुजारा (नाबाद ८ धावा) या जोडीने विजयावर शिक्‍कमोर्तब केला. सचिनने सलग दोन चेंडूवर दोन षट्कार खेचून विजय साकारला.

कांगारूचा भारतीय संघाने आठ गडयांनी पराभूत करण्‍याची ही पहिलीच वेळ आहे. कर्णधार धोनीने ऑस्‍ट्रेलियाविरूद्ध सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्‍येबरोबर गांगुलीच्‍या कर्णधार म्‍हणून सर्वाधिक (२१ सामने) विजयाच्‍या विक्रमाशी बरोबरी केली आहे. चेन्‍नई येथील पहिल्‍या कसोटीत विजय मिळवून टीम इंडियाने गावसकर-बॉर्डर ट्रॉफी मालिकेत १-० ने आघाडी घे‍तली आहे.