
मुंबई – राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. मनसेने ठाकरे सरकारला मंदिरे कधी उघडणार यावरुन पुन्हा एकदा प्रश्न विचारला आहे. मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी ठाकरे सरकारला पुनश्च हरि ओम असे म्हणता आणि हरिलाच कोंडून ठेवता? हा प्रश्न विचारला आहे. ठाकरे सरकारवर बाळा नांदगावकर यांनी ट्विट करुन टीका केली आहे.
कोरोना फक्त मंदिरातच होतो का? मनसेचा ठाकरे सरकारला प्रश्न
राज्यातील बार उघडले गेले, बारची वेळही ठरवून देण्यात आल्यानंतर जलतरण तलाव आणि मल्टिप्लेक्स यांनाही संमती देण्यात आली. मग कोरोना फक्त मंदिरातच होतो का? हा फक्त भावनेचा प्रश्न नाही तर मंदिरांवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांच्या रोजी-रोटीचाही प्रश्न असल्याचे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.
तेथील संबधित हजारो व्यावसायिकांच्या उपजीविकेचा व रोजगाराचा देखील प्रश्न आहे.@CMOMaharashtra ,@mnsadhikrut ,@abpmajhatv ,@News18lokmat ,@zee24taasnews ,@TV9Marathi
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) November 6, 2020
ठाकरे सरकारवर मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरुन मनसे बाळा नांदगावकर यांनी ट्विट करुन टीका केली आहे. बारची वेळ ठरवून दिली गेली आहे, जलतरण तलाव खुले केले आहेत. मल्टिप्लेक्सलाही संमती देण्यात आली आहे. मग फक्त मंदिरात कोरोना असतो का? या सरकारचा या मागे काय तर्क असावा हे एक कोडच असल्याचेही बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.
