इंफ़ाळ: येथील लष्कराच्या जनसंपर्क अधिकाऱ्याला तब्बल १५ कोटी रुपये किंमतीचे अमली पदार्थ बाळगल्याबद्दल लष्कराच्या पोलिसांनी अटक केली आहे. हे अमली पदार्थ म्यानमारमध्ये तस्करी करून पाठविले जाणार होते. संरक्षण विभागामार्फत या तस्करीची चौकशी सुरू आहे.

कर्नल अजय चौधरॆअसे या अधिकाऱ्याचे नाव असून तो चार वर्षापासून इंफाळ येथे लष्कराचा जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्याच्यासह प्रादेशिक लष्करातील आणखी एका जवानालाही या तस्करी प्रकरणी अटक केली आहे.
तीन वाहनांमधून ‘सुडोफेड्राईन’ या अमली पदार्थाच्या गोळ्यांची वाहतूक करताना पल्लेल या गावाजवळ पकडण्यात आले. या गोळ्या वाहनांच्या टपजवळ लपवून म्यानमार सीमेलगतच्या मोरेह या गावाकडे नेल्या जात होत्या.
‘सुडोफेड्राईन’ हा अमली पदार्थ उत्तेजक म्हणून वापरला जात असून त्याला आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. या पदार्थाच्या सेवनाने हृदयाचे ठोके आणि रक्तदाबात मोठ्या प्रमाणात होते आणि त्याचा परिणाम म्हणून कमालीचा अशक्तपणा येतो.