
पुणे: सर्वसामान्यांमधील हिरोने मराठी रसिकांचा ठाव घेतल्यानंतर आता खर्या अर्थाने समाजकारण आणि राजकारणाची सांगड घालून सर्वसामान्यांचा विकास घडवण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारा; दोहोंमधील दुवा ठरणारा हिरो लवकरच रूपेरी पडद्यावर चमकणार आहे.

पुणे: सर्वसामान्यांमधील हिरोने मराठी रसिकांचा ठाव घेतल्यानंतर आता खर्या अर्थाने समाजकारण आणि राजकारणाची सांगड घालून सर्वसामान्यांचा विकास घडवण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारा; दोहोंमधील दुवा ठरणारा हिरो लवकरच रूपेरी पडद्यावर चमकणार आहे.
जश पिक्चर्सच्या बॅनरखाली बनणार्या ‘नगरसेवक-एक नायक’ या आगामी मराठी सिनेमाद्वारे हा हिरो मराठी रसिकांच्या भेटीला येणार आहे. शशिकांत चौधरी आणि जयश्री चौधरी यांची निर्मिती असलेल्या ‘नगरसेवक-एक नायक’चा मुहूर्त नुकताच पार पडला.
यावेळी प्रसिद्ध गायक सुखविंदर यांच्या आवाजात ‘आया नगरसेवक, आपला नगरसेवक, माझा नगरसेवक, आला नगरसेवक…’ हे शीर्षक गीत ध्वनिमुद्रित करण्यात आले. हिंदी-मराठी शब्दांचे मिश्रण असलेले हे गीत बिपीन धायगुडे यांनी लिहिले असून देव चौहान यांनी संगीतबद्ध केले आहे. मराठी सिनेसृष्टीतील मान्यवरांसोबत सिनेमातील कलाकार, तंत्रज्ञ, गायक, संगीतकार आदी मंडळी उपस्थित होती.
दिपक कदम हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. ज्या विभागाचा नगरसेवक खमका त्या विभागाचा विकास झपाट्याने होतो; हे कोणीही अमान्य करणार नाही. आपल्या विभागाच्या विकासाचा घट्ट पाया रोवण्याचे काम नगरसेवकाचे असते. त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून देशाचा विकास घडत असतो. याच कारणामुळे समाजकारण आणि राजकारणाचा योग्य ताळमेळ साधत आजवर बर्याच धडाकेबाज नगरसेवकांनी थेट मंत्रीपदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत मजर मारलेली पाहायला मिळते.
‘नगरसेवक- एक नायक’ या सिनेमातही अशाच एका सर्वसामान्य धडाकेबाज तरूणाची कथा पाहायला मिळेल; जो नगरसेवकपदाच्या माध्यमातून समाजाचा विकास घडविण्याची प्रतिज्ञा करतो. राजकीय डापवेच, भावनिक संघर्ष, जीवनातील चढउतार, वैयक्तिक पातळीवर वाट्याला आलेली सुख-दुःखे, समाजाच्या विकासाची उदात्त भावना यांसारख्या विविध पैलूंचा समावेश नगरसेवक- एक नायकयध्ये करण्यात येणार आहे.
या चित्रपटाची कथा-पटकथा बिपीन धायगुडे, गीतलेखन अभिजित कुलकर्णी यांनी केले आहे. नेहा पेंडसेसह त्रियुग मंत्री हा नवोदित चेहरा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय , गणेश यादव, संजय खापरे, विनय आपटे, प्रदीप पटवर्धन, सुनील तावडे, विजय निकम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.