पुणे: ‘विसावा – एक घर मनासारखं’ हा नवीन कार्यक्रम स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणार आहे. विसावा हे महाराष्ट्रातील रिअल इस्टेट बिल्डर्स आणि डेव्हलपर्ससाठी एक असे व्यासपीठ आहे जे त्यानां गरजांनुरुप घर किंवा व्यावसायिक तत्त्वावरील जागा विकत घेऊ इच्छिणार्या ग्राहकांपर्यंत पोहोचवेल.
टीव्ही कलाकार अनुजा साठे विसावाचे संचालन करणार आहेत आणि हा कार्यक्रम दर रविवारी सकाळी १०.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होईल.विसावा; घर मनासारखे या कार्यक्रमाची विभागणी ३ भागांमध्ये केली गेली आहे.
बिल्डर्सची साईट व आणि विविध सुविधा, रेल्वे स्टेशन, शाळा, बाजार, मॉल्स इत्यादींपासूंनच अंतर अशा गोष्टींचा आढावा घेऊन मग प्रकल्पातील मुख्य अधिकार्यांशी संवाद साधला जाणार आहे. त्यानंतर अंतर्गत सजावटीवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार. तिसर्या भागात दैनंदिन जीवनातील वास्तुशास्त्राच्या महत्त्वावर चर्चा करण्यात येणार आहे.