तिस-या दिवशी सावध सुरूवात करणा-या सचिन तेंडुलकरने चाहत्यांना निराश केले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार क्लार्कचा फिरकीपटू नॅथन लॉयनला गोलंदाजी देण्याचा निर्णय अचूक ठरला. लॉयनने आपल्या अप्रतिम फिरकीवर सचिनला बोल्ड केले. सचिन ८१ धावा काढून बाद झाल्यानंतर चेपॉक स्टेडिअमवर एकदम सन्नाटाच पसरला. खेळपट्टीवर विराट कोहली आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा टीम इंडियाने चार गडी बाद २५२ धावा केल्या होत्या.
ऑस्टेलियाच्या ३८० धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी लवकर तंबूत परतल्यानंतर सचिनने चेतेश्वर पुजाराच्या साथीने सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आणि शानदार अर्धशतक ठोकून तमाम टीकाकारांचे तोंड बंद केले होते. पुजारा बाद झाल्यानंतर त्याने टीम इंडियाचा डाव कोहलीच्या साथीने पुढे नेला. सचिनने दिवसाची सुरूवातच चौकाराने केली आणि आपले इरादे ऑस्ट्रेलियन संघाला दाखवून दिले. आज रविवार सुटीचा दिवस असल्याने व सचिन शतकाच्या जवळ आल्याने सामना पाहण्यासाठी चेपॉक स्टेडिअमवर प्रेक्षकांनी गर्दी केली होती. त्यांमुळे सर्वाचे लक्ष सचिनच्या खेळीकडे होते. मात्र फिरकीपटू नॅथन लॉयनने आपल्या अप्रतिम फिरकीवर सचिनला बोल्ड केले. सचिन ८१ धावा काढून बाद झाला.
त्यानंतर खेळाची सूत्रे विराट कोहली आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी या जोडीने हाती घेतले आहेत. अर्धशतकाची बह्गीदारी करताना दोघांनी पिछाडी भरून काढली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा टीम इंडियाने चार गडी बाद २५२ धावा केल्या होत्या. विराट कोहली ८२ आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी २७ धावावर खेळत होते.