सिल्लोड: काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य ठगन भागवत मित्रमंडळाच्या वतीने 28 फेब्रुवारी रोजी होणार्या शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार सोन्याच्या फाळ असलेल्या नांगराने जमीन नांगरणार आहेत.

सिल्लोड: काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य ठगन भागवत मित्रमंडळाच्या वतीने 28 फेब्रुवारी रोजी होणार्या शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार सोन्याच्या फाळ असलेल्या नांगराने जमीन नांगरणार आहेत.
अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद मैदानावर दुपारी एक वाजता शेतकरी व महिला बचत गट मेळावा होईल, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे यांनी दिली.
शिवाजी महाराजांनी सोन्याच्या नांगने जमीन नांगरल्यावर दुष्काळ हटला होता. त्यामुळे पवार यांच्या हस्ते हा उपक्रम आयोजित केला आहे; अशी माहिती आयोजक भागवत यांनी दिली.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड राहणार असून उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे , महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळुंके , नगरविकास मंत्री भास्कर जाधव प्रमुख पाहुणे राहणार आहेत.