शिक्षकाने केला विद्यार्थिनीवर बलात्कार

भंडारा: तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांचा खून केल्याची घटना ताजी असतानाच आता भंडारा जिल्ह्यात शिक्षकानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून; आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक असलेल्या यादव बोरकर (वय ४६) असे त्याचे नाव असून याने एका १३ वर्षीय मुलीला शाळेत सोडतो असे सांगून अज्ञात ठिकाणी नेले आणि बलात्कार केला. ही घटना २० फेब्रुवारीला घडली असून, शुक्रवारी (ता. २२) गुन्हा दाखल करण्यात आला.

भंडारामध्ये तीन अल्पवयीन मुलींच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी अद्याप एकही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. याचे पडसाद संसदेतही उमटले आहेत. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी या मुलींच्या कुटुंबीयांची भेट घेतली.