हैदराबाद: भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी दुहेरी स्फोटांनी हादरलेल्या हैदराबाद शहराला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना राजनाथ यांनी पाकिस्तानबरोबरचे राजनैतिक संबंध कमी करण्याची मागणी केली.

हैदराबाद: भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी दुहेरी स्फोटांनी हादरलेल्या हैदराबाद शहराला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना राजनाथ यांनी पाकिस्तानबरोबरचे राजनैतिक संबंध कमी करण्याची मागणी केली.
येथे आलेल्या राजनाथ यांनी स्फोट झालेल्या ठिकाणांना भेट दिली. याशिवाय, विविध रुग्णालयांमध्ये जाऊन त्यांनी जखमींचीही विचारपूस केली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला. दहशतवाद उखडून टाकण्यासाठी लागणार्या निर्धाराचा सरकारकडे अभाव आहे. संभाव्य दहशतवादी हल्ल्यांची गुप्तचरांकडून मिळालेली माहिती राज्यांपर्यंत पोहोचवण्यात या सरकारला अपयश आले; अशी टीका सिंह यांनी केली.
पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाबाबत सरकार सौम्य धोरण स्वीकारत असल्याने तूर्त पाकिस्तानबरोबरचे राजनैतिक संबंध कमी केले जावेत. त्या देशाबरोबरच्या परस्परविश्वास वाढीस लागण्यासाठीच्या उपाययोजनाही पुढे नेल्या जाऊ नयेत, अशी मागणी सिंह यांनी केली.