बॉलीवुडमध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्राने हिट सिनेमे देऊन स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने प्रत्येक सिनेमात काम करीत असतना वेगवेगळी भूमिका केली आहे. तिने आपल्या एक्टिंगच्या माध्यमातून प्रतिभा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.आगामी काळात येत असलेल्या ‘गुंडे’ या सिनेमात प्रियंका एक टिपिकल देसी गर्लच्या भूमिकेत दिसणार आहे.
या सिनेमाचे दिग्दर्शन अब्बास जफरने केले आहे. गुंडे सिनेमातील प्रिंयकाची भूमिकेची पूर्ण कल्पना अजून कोणालाच आलेली नाही. सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार प्रियंका काही दिवसापूर्वीच कोलकातामध्ये सिनेमाच्या शूटिंगसाठी आली होती. त्याठिकाणी ती देशी अंदाजमध्ये पहावयास मिळणार आहे.
सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार कोलकातामधील शूटच्यावेळी प्रियंका चोप्रा बिल्कुल देशी लूकमध्ये दिसली. तिने यावेळी गावातील मुलीसारखा ड्रेस घातला होता. यावेळी ती शूटिंगमध्ये व्यस्त होती. यापूर्वी प्रियंका चोप्रा अग्निपथ सिनेमात देखील अशाच भूमिकेत दिसली होती. गुंडे या सिनेमातील तिचा गेट अप पाहून ती पुन्हा देसी गर्लच्या भूमिकेत दिसणार असे वाटते.
प्रियंकाचा ‘बर्फी’ हा सिनेमा ऑस्कर्स सिनेमाच्य नॉमिनेशनसाठी पाठविला होता. मात्र याठिकाणी ऑस्कर्समध्ये काही यश मिळले नाही. या सिनेमातील प्रिंयका चोप्राच्या एक्टिंगचे सर्वांनी कौतुक केले होते. याशिवाय आगामी काळात प्रियंकाचे ‘जंजीर’, ‘क्रिश-३’ , ‘मैरी कॉम बायोपिक’ आणि ‘मिलन टॉकीज’ हे सिनेमे येत आहेत. या सर्व सिनेमात प्रिंयकाची भूमिका वेगवेगळी आहे.