भंडारा बलात्काराप्रकरणी पोलीस निरिक्षक निलंबित

भंडारा: भंडार्‍यामधील तीन अल्पवयीन मुलींच्या बलात्कार आणि हत्याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रकाश मुंडे यांना निलंबित करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ निलंबनाचे आदेश दिले आहेत.

भंडारा जिल्ह्यातील मुरमाडी गावात एकाच कुटुंबातल्या तीन सख्या बहिणींची बलात्कार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. दि. १४ फेब्रुवारीला या तीन बहिणी बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांनी गावाजवळ असलेल्या ढाब्यानजीकच्या एका विहिरीत या तीन बहिणींचे मृतदेह सापडले. या मुलींवर बलात्कार झाल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले. मुख्यमंत्र्यांनी पीडीत कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

या घृणास्पद घटनेत एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींची बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली. या तिघीही अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. या मुलींवर बलात्कार झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. ग्रामीण भागातील मुलीही सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा दिसून आले.