अमरसिंह दुबईत रुग्णालयात दाखल

दुबई: गेल्या काही काळापासून राजकारण आणि प्रसिद्धी पासून दूर राहिलेले राष्ट्रीय लोकमंचचे अध्यक्ष अमरसिंह यांना दुबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अमरसिंह दुबईवरून सिंगापूरला जात होते. त्यावेळी एअरपोर्टवर अमरसिंह बेशुद्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे. अमरसिंह यांना दुबईतील वेलकेअर रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अमरसिंहांची प्रकृती गंभीर असली, तरी सध्या प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

राष्ट्रीय लोकमंच पक्षाची स्थापना करण्याआधी अमरसिंह समाजवादी पार्टीत होते. समाजवादी पक्षात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगण्यात येत आहे.