मराठी चित्रपटात अलीकडे प्रेक्षकांना नवे काहीतरी देण्याचा चित्रपट निर्मात्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. या प्रयत्नातूनच अनेक नवे प्रयोग मराठी चित्रपटात घडताना दिसतात. असाच एक नवा आणि मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळी ओळख देणारा प्रयोग वेलकम टू जंगल या चित्रपटाद्वारे केला जात आहे.
मराठीतला हा पहिला साहसी वैज्ञानिक कथा अर्थात अॅडव्हेंचर सायन्स फिक्शन असलेला हा चित्रपट आहे. उच्च दर्जाची ग्राफिक्स व्ही एफ कस, क्रोमा तंत्रज्ञाचा सढळ वापर अशी उंचावलेली तांत्रिक मूल्यं, हॉलिवूडच्या तोडीचे व्हिज्युअल इफेक्टस् असलेला हा चित्रपट मराठीत आजपर्यत कधीही न दिसलेली सायन्स फिक्शन पडद्यावर साकारणार आहे.
गुरुमाउली क्रिएशनची निर्मिती असलेल्या नितीन कुलकर्णी लिखित संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटामध्ये नायक देवेंद्र, अभिनेत्री दीपाली सय्यद, रुचिता जाधव, मिलिंद शिंदे मुख्य भूमिकेत असून तेजश्री खेळे, नितीन कुलकर्णी, दादू ,गणेश मयेकर, अनिल राबाडे, विजय चव्हाण सहकलाकार आहेत.
या चित्रपटाचे खास आकर्षण म्हणजे महेश कोठारे या चित्रपटात एका विशेष भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.‘संभा- आजचा छावा’ या चित्रपटामुळे लोकप्रियता लाभलेल्या नायक देवेंद्रने या चित्रपटात डमी न वापरता स्वत:च वास रोखून धरणारे अनेक चित्तथरारक स्टंट केले आहेत. सलग ३० तास चित्रीकरणाचा नवा विक्रम या चित्रपटाने प्रस्थापित केला आहे. कला दिग्दर्शक सतीश बीडकर यांर्नी केले आहे.